कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
  कोऱ्हाळे बुद्रुक गावातील एका जेष्ठ व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कातील १२ कुटुंबियांचे स्वॅब कोरोनाच्या तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी १० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कोऱ्हाळेकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे मात्र अजून ही दोन जणांचे रिपोर्ट यायचे बाकी असल्याने ग्रामस्थ गॅसवर असल्याचे चित्र आहे.
     त्या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रशासन सतर्क आले असून गाव २८ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांचे स्वॅब तपासणी साठी घेतले होते त्यापैकी १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर रुग्णाची पत्नी व शेजारील मुलाचा अहवाल येणे बाकी आहे. 
   शिवाय रुग्णाचा दुसरा मुलगा व त्याचे कुटुंबीय पुण्यात राहतात. लॉकडाउन दरम्यान ते ही रुग्णाच्या घरीच वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांची ही तपासणी पुणे येथे होते आहे. बाकी दोन रिपोर्ट निगेटिव्ह यावे यासाठी कोऱ्हाळेकर सिद्धेश्वराकडे प्रार्थना करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post