कोऱ्हाळे बुद्रुक प्रतिनिधि:
    कोऱ्हाळे बुद्रुक गावात एका ९० वर्षीय जेष्ठाला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता प्रशासन सज्ज झाले असून मागील चार दिवसांत अनेक लोक मुंबई ,पुण्याहून गावात आलेले आहेत अशा लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले आहेत.
     गेल्या काही दिवसांत गावातील समतानगर, पेशवेवस्ती, गावठाण, चर्मकार वस्ती परिसरात अनेक लोक आले आहेत. वास्तविक बाहेरून आलेल्यांना शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन करणे गरजेचे होते मात्र त्यांना शाळेत क्वारंटाईन न करता होम क्वारंटाईन केले गेले त्यामुळे त्यांना क्वारंटाईनचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. त्या कुटुंबातील अनेक सदस्य मोकाट बाहेर फिरत आहेत. त्यामुळे इतर ग्रामस्थांना धोका होऊ शकतो. ही बाब काही जागरूक ग्रामस्थांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या लक्षात आणून दिली असता अशा व्यक्तींना शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले व जे लोक हे आदेश मानणार नाहीत अशा लोकांवर पोलीस कारवाई करण्याचा सूचना त्यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना दिलेत.
    मात्र आता ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना प्रतिबंधक उपाय योजना समिती कशा प्रकारे प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करते हे पाहावे लागेल

Post a Comment

Previous Post Next Post