जगात व भारतात कोरोनाची महामारी सुरू असताना वाघळवाडी येथील प्रदीप उर्फ दादू मांगडे पाटील नावाचा योद्धा एकटा लढत आहे. कोरोनाशी दोन हात करताना या युवा समाजसेवकाने आतापर्यंत स्वखर्चाने सुमारे दोन लाखाहून अधिक रक्कम जनसेवेसाठी खर्च केली आहे.
भारतात लॉकडाउन सूरु झाल्यापासून या युवा नेता झपाटल्या प्रमाणे रात्रनदिवस लोकसेवा करत आहे. आपल्या डी एम सोशल फाउंडेशन व स्व भगवानराव मांगडे पाटील ट्रस्ट च्या वतीने सामाजिक काम करत असताना या युवा नेत्याने दाखवून दिले आहे की समाज सेवा करायची असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या राजकीय पदाची गरज नसून केवळ सामाजिक व राजकीय इच्छाशक्ती गरजेची आहे. आपल्या राज्यभर पसरलेल्या कार्यकर्त्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून या युवानेत्याने संबंध महाराष्ट्रात आपल्या कामाची छाप पाडली आहे.
दादू मांगडे पाटील यांनी आता पर्यंत एक क्विंटल बासमती, दोन क्विंटल साखर, दोन पिक अप भाजीपाला, ५०० मास्क, दोनशे लिटर सॅनिटाईझर, औषधे, किराणा मालाचे साहित्य अशा प्रकारे वाटप करत आतापर्यंत तीन हजार कुटुंबापर्यंत मदत पोचवली आहे.
याशिवाय त्यांनी अनेक लोकांना आर्थिक मदत केली आहे. रस्त्याने जाणाऱ्या मजुरांची त्यांनी जेवणाची व्यवस्था केली शिवाय त्यांना घरी पोहोच करण्याची व्यवस्था केली. डी एम थाळीच्या माध्यमातून त्यांनी दररोज १०० गरजूंना जेवणाची व्यवस्था केली आहे. गावातील वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत.
शेतकऱ्यांच्या डिझेल साठी व दुधाच्या प्रश्नासाठी त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांशी फोनवरून संपर्क साधत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. तसेच त्यांनी आमदार रोहितदादा पवार, राम सातपुते, संजय जगताप, अशोक पवार, सुनील आण्णा शेळके, माजी खा. राजू शेट्टी यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संपर्क केला होता.
दादू मांगडे पाटील यांनीच सर्वप्रथम सोमेश्वर साखर कारखान्याने सभासदांना मोफत सॅनिटाईझर द्यावे अशी मागणी केली होती याशिवाय त्यांनी लॉकडाउन च्या काळात वीज बिल आकारू नये अशी मागणी ऊर्जामंत्री यांच्याकडे केली आहे. राज्यभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग असून त्यांच्या जीवनावर भाऊ असलेल्या क्रमशः लेखांना तुफान प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काही दिवसांत त्यांच्या जीवनावर लघुपट प्रसिद्ध होणार असून त्यांना येणाऱ्या काळात जिल्ह्याचे मोठे पद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून हा युवा नेता भविष्यात मोठा राजकीय हस्ती होणार यात दुमत नाही.
Post a Comment