माळेगाव  प्रतिनिधी- 
       तहसीलदार कचेरीत  होणा-या विविध प्रकरणाची  सुनावणी  आता  प्रत्येक  मंडलात  सुरु  करण्याचा  अभिनव  उपक्रम  तहसीलदार  विजय पाटिल  यांनी  सुरु  केला असुन  या  उपक्रमाचे  स्वागत  तक्रारदार  ग्रामस्थांनी  केले  आहे.या अभिनव  उपक्रमाचा   तालुक्यातील  आठ मंडलातील तक्रारदारांना  फायदा  होणार आहे. 
       बारामती  तहसीलदार  कचेरीत दरमहा  तालुक्यातील  विविध  गावातील  ग्रामस्थ,शेतकरी यांच्या  तहसीलदार  यांच्याकडे असलेल्या रस्ता,दरखास्त,अतिक्रमण  व महसुला  अंतर्गत येणा-या विविध  तक्रारींवर  सुनावणी   होत  असते.त्यामुळे  तक्रारदारास  सुनावणी  तारखेला  बारामती  येथे  कचेरीत  हजर  व्हावे  लागते.
     कोरोनामुळे  गेली  अनेक  दिवस तहसिल  कचेरीत  सुनावण्या  होऊ  शकल्या  नाहीत. तहसीलदार  कचेरीत  गर्दी  होऊ  नये,गर्दीमुळे  कोरोनाचा  प्रसार  होऊ नये यासाठी  तहसीलदार  विजय पाटिल  यांनी  सुनावणीसाठी  एक  अभिनव  संकल्पना  सुरु  केली  आहे. यापुढे  तहसिल  कचेरीत  होणा-या  सुनावण्या तालुक्यातील  प्रत्येक  मंडलात  महिन्यातील  ठराविक  दिवशी  होणार  आहे. या अभिनव  संकल्पनेची  सुरवात पणदरे ता.बारामती  या मंडलात सुरु  करण्यात  आली आहे. पणदरे  मंडला  अंतर्गत  येणा-या  18 गावातील विविध  तक्रारींची  सुनावणी  तहसीलदार  विजय पाटिल  यांनी  घेतली. 
     यावेळी  मंडलाधिकारी  रवी  पारधे,तलाठी  एल.एस.मुळे,आर.एन.कोल्हे,ए.ए.भगत,डि.एस.तलवार,उज्वला भगत,कोतवाल  पांचाली  जगताप व तक्रारदार  उपस्थित  होते.
  दरम्यान  प्रत्येक  मंडलात  सुनावणी  घेणाचा  उपक्रम  लोक हिताचा  असुन  यामुळे  तक्रारदाराचा  वेळ  व पैसा  वाचणार  आहे  अशी  माहिती  तलाठी एल.एस.मुळे यांनी दिली.   
  

Post a Comment

Previous Post Next Post