माळेगाव  प्रतिनिधी- 
  कोरोनामुळे मुस्लिम  बांधवांनी  शासनाच्या आदेशानुसार इदगाह व मस्जिद मधे गर्दी न करता घरीच नमाज  पठण  करुन ईद साजरी केली. इतिहासात प्रथमच हिंदू  मुस्लिम  बांधवांच्या  ऐकीत खंड पडला.कोरोनाचे  संकट  दुर व्हावे यासाठी  सर्व मुस्लिमांची  प्रार्थना  केली. 
  माळेगाव  व परिसरात  मुस्लिम  बांधवांची  संख्या  मोठी आहे. दरवर्षी  हे बांधव  रमजान  ईद  मोठ्या  प्रमाणात  साजरी करतात.यावर्षी  कोरोनामुळे रमजान  महिन्याच्या  निमित्ताने  पवित्र  रोजे अर्थात उपवास  घरीच करावे लागले.शासनाने  मस्जिद मधे गर्दी  करु नये  असे आवाहन  केले  होते. 
   मुस्लिम  बांधवांनी  देखील  घरीच नमाज पठण  करुन ईद  साजरी  केली.एकमेकांना  गळा भेट न घेता सोशल  डिस्टन्सींचे पालन करत  शुभेच्छा  दिल्या. यावर्षी  मात्र शिरखुर्मा खाता आला नाही. अनेक  मुस्लिम  बांधवांनी  दिलगिरी  देखील  व्यक्त  केली.
  दरम्यान  माजी सभापती  संजय  भोसले,सरपंच  जयदीप  तावरे,सहायक पोलिस निरीक्षक  प्रमोद  पोरे यांनी मुस्लिम  बांधवांना  रमजान  ईदच्या  शुभेच्छा  दिल्या  व घरीच ईद  साजरी  केल्याने  कौतुक  देखील  केले.
  दरम्यान  देशावरील कोरोनाचे संकट दुर व्हावे  यासाठी  सर्व  मुस्लिम  बांधवांनी  प्रार्थना  केली असे उपसरपंच  अजित तांबोळी यांनी  सांगितले. 
  

Post a Comment

Previous Post Next Post