कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुढाळे ( ता. बारामती ) येथील मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण न करता सॊशल डिस्टन्सिंग पाळत घरीच नमाज पठण अदा केले. तसेच भारताला कोरोनामुक्त करण्याची प्रार्थना अल्लाकडे केली.
राज्यात सध्या कोरोनाचा थैमान सुरू आहे. त्यातच मुस्लिम धर्मियांचा पवित्र समजला जाणारा रमजान ईद चा सण आल्याने सामुदायिक नमाज पठण ना करण्याबाबतचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला बारामतीतील मुस्लिम बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. गावागावात मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये गर्दी न करता घरीच नमाज पठण केले. शिवाय मुस्लिम धर्मियांत एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देण्याच्या प्रथा आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दुरूनच पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
मुढाळे येथील सामाजिक कार्यकर्ते जमीर मुजावर यांच्या कुटुंबातील पुरुष व महिलांनी नमाज पठण करत भारत कोरोनामुक्त कर अशी प्रार्थना अल्लाकडे केली. यावेळी पायल जमीर मुजावर, काजल मुन्ना मुजावर, नियाज मोहम्मद मुजावर, कासमभाई मुजावर, महम्मद मुजावर उपस्थित होते.
Post a Comment