माळेगाव  प्रतिनिधी-
      बारामती शहरात  रक्ताचा  तुटवडा  निर्माण  झाल्याने  रमजान  ईद  निमित्ताने  रक्तदान  शिबीरात  120 जणांनी  रक्तदान  केले. 
     कोरोनामुळे शहरात अनेक  दवाखान्यात  उपचार  घेणा-या रुग्णांना  रक्ताचा  तुटवडा  जाणवत आहे. शहरातील ब्लड बॅकांनी   रक्तदान  करण्याचे आवाहन  केले. या आवाहनास  प्रतिसाद देत एस.पी.सोशल  फाऊंडेशन व संविधान  युवा  प्रतिष्ठानच्या  वतिने  लेट माणिकलाल  चंदुलाल  ब्लड बॅकेत रक्तदान  केले. 
     यावेळी  120 जणांनी  रक्तदान  केले.या शिबिराचे आयोजन  एस.पी.सोशल  फाऊंडेशनचे  अध्यक्ष  सुरज शिंदे व संविधान  युवा प्रतिष्ठानचे  अध्यक्ष  सिध्दांत  सावंत  यांनी  केले. 

Post a Comment

Previous Post Next Post