माळेगाव प्रतिनिधी-
बारामती शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रमजान ईद निमित्ताने रक्तदान शिबीरात 120 जणांनी रक्तदान केले.
कोरोनामुळे शहरात अनेक दवाखान्यात उपचार घेणा-या रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शहरातील ब्लड बॅकांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत एस.पी.सोशल फाऊंडेशन व संविधान युवा प्रतिष्ठानच्या वतिने लेट माणिकलाल चंदुलाल ब्लड बॅकेत रक्तदान केले.
यावेळी 120 जणांनी रक्तदान केले.या शिबिराचे आयोजन एस.पी.सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरज शिंदे व संविधान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिध्दांत सावंत यांनी केले.
إرسال تعليق