बारामती :
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांची ‘सावली’, वंचित बांधवांची ‘माऊली’ माता रमाईंच्या स्मृतीदिनानिमित्तं विनम्र अभिवादन. माता रमाई म्हणजे दिनदुबळ्यांची आई, त्यागाची मूर्ती, माता रमाईंनी प्रचंड कष्ट, गरीबीचे चटके सहन करत डॉ. बाबासाहेबांना समर्थ साथ दिली. डॉ. बाबासाहेबांच्या महामानवापर्यंतच्या प्रवासातील त्या प्रमुख साथीदार बनल्या. माता रमाई नसत्या तर कदाचित डॉ. बाबासाहेब घडले नसते. डॉ. बाबासाहेबांना महामानव पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या आमच्या माता रमाईंना त्रिवार वंदन.
अशा शब्दात अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी अभिवादन केले आहे.
إرسال تعليق