कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
कोऱ्हाळे बुद्रुक येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या भोंगळ आणि गलथान कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्याने बँकेची चावी घरी विसरल्याने साडे दहा वाजले तरी बँकेला टाळेच होते त्यामुळे बँकेच्या बाहेर लोकांना ताटकळत बसावे लागले आहे.
गावातील युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या गचाळ कारभारासाठी प्रसिद्ध आहे. बँकेचे अधिकारी खातेदारांशी नेहमीच उर्मटपणे बोलत असतात. अनेकदा बँक उशिरा उघडण्यात येते. तर भरणा मात्र लवकर बंद करण्यात येतो. बँकेत कर्मचारी व अधिकारी नेहमीच मुजोरी करत असतात. उशिरा का आला असा जाब विचारल्यावर त्या ग्राहकांची अडवणूक केली जाते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॊशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र बँकेत उज्वला, अपंग निधी जमा झाल्याने बँकेत जेष्ठ व अपंगांची गर्दी होत आहे. बँकच उशिरा उघडली जाते त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी गर्दी होत असते. बँक अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे जेष्ठाना व अपंगांना ताटकळत बसावे लागते. बँकेच्या व्यवस्थापकांचा तर सकाळी 11 वाजेपर्यंत तपासाच नव्हता. त्यामुळे या मुजोर व कामचुकार कर्मचाऱ्यांना आवर घालावा अशी मागणी खातेदार करत आहेत
إرسال تعليق