लाटे (दि२१ ):   आजारी बहिणीला पुणे येथिल हॉस्पिटला भेटायला गेलेल्या बारामती तालुक्यातील लाटे गावातील युवकावर काल रात्री काळाने घाला घातला. बहिणीला भेटून पुण्यावरून माघारी दुचाकीवरुन बारामतीकडे येत असताना जेजुरी येथे समोरून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने या युवकाचा जागीच मृत्यु झाला.   किशोर भीमराव खलाटे (वय ३२) रा.लाटे(ता.बारामती ) असे या अपघातात मृत्यमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. सविस्तर हकीकत अशी की या युवकाची बहीन  पुणे येथील  नोबेल हॉस्पिटल चार दिवस झाले अॅडमिट आहे.  त्यामुळे पेशंटचे कपडे, डबा घेऊन हा युवक दवाखान्यात गेला होता. काल संध्याकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास जेजूरी नजिक माऊली ढाब्याजवळ ट्रक ने समोरून या युवकाच्या दुचाकीला  धडक दिल्याने या अपघातात या युवकाचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहीती लाटे गावात कळताच गावावर शोककळा पसरली. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई वडील एक भाऊ असा परीवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post