माळेगाव प्रतिनिधी- पुणे व मुंबई येथुन येणा-या नागरिकांनामुळे माळेगाव व परिसरात कोरोनाचा धोका वाढला असुन पोलीस,आरोग्य,महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली आहे.बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती लपवल्यास गुन्हा दाखल होणार असुन 108 लोकांना होम कोरटाईंन केले आहे.
   कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने पुणे व मुंबई येथुन अनेक नागरिक हे आपल्या गावी येत आहे.कुणाचा भाऊ,मुलगा,लेक,जावई,बहिण किंवा बाहेर गावी व्यवसाय व नोकरी निमित्ताने स्थायिक झालेले नागरिक माळेगावात येत आहे.यामुळे गावाला कोरोनाचा विळखा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पार्श्वभूमीवर गावातील पोलिस,आरोग्य,महसूल व ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे.
 परगावाहुन आलेल्या नागरिकांची माहिती द्या,ति लपवू नका,गावाला कोरोनात ढकलु नका अशा प्रकारची दवंडी गावात पोलिस प्रशासन देत आहे.माहिती लपवण्याच्या प्रयत्न केल्यास संबधित ग्रामस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
  दरम्यान बाहेर गावाहुन आलेल्या नागरिकांना होम कोरटाईंन करण्यासाठी मराठी शाळा ताब्यात घेऊन सोय केली आहे.आरोग्य विभाख दररोज ग्रामस्थांच्या दारी व  घरी जाऊन माहिती संकलन करत आहेत.आत्तापर्यंत 108 जणांना होम कोरटाईंन केले आहे अशी माहिती आरोग्य सेवक नवनाथ शिंदे,एस.आर. सातव,माधुरी शिंदे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post