को-हाळे बु। (दि २०) : मुंबईवरून गावी आलेल्या व स्वताहून को-हाळे बु।शाळेमध्ये क्वारंटाइन झालेल्या कुटुंबाची बारामती पंचायत समितीच्या सभापती निता बारवकर तसेच उपसभापती प्रदिप (बापू )धापटे यांनी सोमवार दि १८ रोजी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत कोविड १९ बाबत सर्व नियमांचे पालन करून काळजी घेण्याच्या सूचना केल्या . सध्या राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून अनेक नियमात शिथिलता करण्यात आली आहे.त्यामुळे मुंबई पुण्याकडून अनेक लोक गावी परतत आहेत.मात्र गावात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणुन संबंधित व्यक्तींना काही दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. अशा व्यक्तींची प्रशासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये विलगीकरणाची सोय केली आहे.तसेच या व्यक्तींना पंचायत समिती तसेच आरोग्य विभागाकडून सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. यांचाच भाग म्हणून या लोकांच्या अडचणी सभापती व उपसभापती यांनी जाणून घेत संबंधित विभागाला यासंदर्भात आदेश दिले. यावेळी आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स डोंबाळे मॅडम व येळे सिस्टर उपस्थित होत्या.
को-हाळे बु। येथिल विलगीकरण कक्षाला सभापती उपसभापतींची भेट. - सा. बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment