बारामती : तालुक्यातील मुर्टी येथे सोमवार दिनांक १८ रोजी  एक कोरोना रुग्ण आढळून आला होता.या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या नऊ व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती यात आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून  रुग्णाच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे .बारामती तालुक्यातील  हा १३ वा  कोरोना रुग्ण ठरला आहे.   मुर्टी महसूली गावाची सीमा  ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. बारामती येथील नागरिकांना  आवाहान करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व  लाॅकडॉऊन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये व प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे अशी विनंती  प्रांताधिकारी यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post