वडगाव निंबाळकर - हेमंत गडकरी
               लॉकडाऊनच्या काळात परवानगी न घेता गावी आलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.
   सध्या राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. मात्र काही प्रमाणात नियमामध्ये शिथिलता करण्यात आलेली आहे. नेमका याचा फायदा घेऊन अनेक जण आता शहारांकडून गावाकडे धाव घेताना दिसत आहेत. त्यामुळे गावोगावी परगावाहून विशेषतः पुणे, मुंबई वरून मोठया प्रमाणावर लोक पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येत आहेत. एकटया बारामती तालुक्यात माळेगाव, मुर्टी, वडगाव निंबाळकर येथे एकूण कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 
     त्यामुळे गावोगावी चिंतेचे वातावरण आहे. दोन महिने लॉकडाऊन चे काटेकोरपणे पालन करुन कोरोनाला दूर ठेवणाऱ्या गावकऱ्यांना मात्र शहरी पाहुण्यांमुळे कोरोनाची भीती सतावत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आदेश काढत जे कोणी परवानगी विना गावात आले आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post