सचिन वाघ.
 को-हाळे बु।:  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोऱ्हाळे बुद्रुक गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय  कोरोना नियंत्रण समितीने घेतला आहे. आज बारामती तालुक्यातील मुर्टी या ठीकाणी मुंबईवरुन गावी आलेला व्यक्ती कोरोना संक्रमित आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.  को-हाळे बु। गावात मोठी बाजार पेठ असून आसपासच्या गावातील अनेक लोक खरेदीसाठी गावात येत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आता खबरदारी घेणे गरजेचे आहे. याचाच भाग म्हणुन   को-हाळे बु गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार  दिनांक २५ मे  पर्यंत बंद राहणार असल्याचे कोरोना नियंत्रित समितीकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post