माळेगाव : वडिलांच्या प्रथम वर्षाश्राध्दाचा होणारा खर्च टाळुन गव्हाणे कुठुंबाच्या वतीने 250 गोरगरिबांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.यामुळे गव्हाणे कुठुंबाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
माळेगाव येथिल गोपाळ समाजाचे नेते व प्रसिद्ध गुरांचे व्यापारी कै.शंकर मारुती गव्हाणे यांचे (दि.29 एप्रिल) रोजी प्रथम वर्षाश्राध्द होते.कोरोनामुळे व लाॅकडाऊन असल्याने त्यांनी वर्षाश्राध्दाला होणारा खर्च गोरगरिबांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप केले.
सरपंच जयदीप तावरे,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अमित तावरे ,प्रशांत मोरे यांच्या उपस्थितीत सुमारे 250 गोरगरिबांना ( शेंगदाणा,साखर,तेल,चहा,बिस्किट,मसाला,साबण,तूरडाळ,मुगडाळ) आदी अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यावेळी संदिप शंकर गव्हाणे,अमर शंकर गव्हाणे,कैलास शंकर गव्हाणे,विजय महादेव गव्हाणे,विजय भोसले,युवराज धनगर,योगेश भोसले,रमेश धनगर,मयुर गव्हाणे ,प्रणव तावरे उपस्थित होते.
आमचे वडिल हे दानशुर होते.कोरोनाच्या संकटामुळे वर्षाश्राध्दाचा खर्च नाहक वाया गेला असता या खर्चाचा उपयोग गोरगरिबांना केल्याने वडिलांचे वर्षाश्राध्द विधायक उपक्रमाने साजरे केल्याचे समाधान वाटत आहे असे संदिप गव्हाणे यांनी सांगितले.
إرسال تعليق