माळेगाव:  सरपंच जयदीप तावरे यांनी तब्बल अकराशे कुठुंबाला भाजीपाला वाटप केला असुन ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
     कोरोनामुळे अनेक कुठुंब हे अडचणीत आहेत.अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.ग्रामस्थांना अनेक जण आपल्या परिने मदत करीत आहेत.ग्रामस्थांना मदतीसाठी सरपंच जयदीप तावरे यांनी पुढाकार घेतला आहे.
      गावातील खडक आळी,जोशीवाडा,दुष्काळी चाळ,भिलारे वस्ती, ढगाई नगर ,विक्रमनगर,दासरी आळी,बागडी आळी आदी भागातील सुमारे अकराशे कुठुंबाला भाजीपाला ( भेंडी,सिमला मिरची,कांदे,टोमॅटो,कोबी) वाटप करण्यात आले.यासाठी सरपंच जयदीप तावरे यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
     सरपंच जयदीप तावरे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत ग्रामस्थ रोहित लोंढे यांनी व्यक्त केले..
     

Post a Comment

أحدث أقدم