माळेगाव: सा.बारामती दर्पण
माळेगाव येथील प्रसिद्ध भाजीपाला व फळविक्रेते कुरबान बागवान यांनी पवित्र रमजान ईदचा सण रद्द करुन गोरगरिबांना भाजीपाला वाटप केला. या उपक्रमाचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे.
माळेगाव येथील सुप्रसिद्ध भाजीपाला व फळविक्रीचा व्यवसाय अनेक वर्षे कुरबान बागवान हे करत आहेत.याकरिता त्यांना कुठुंबाची मदत होते.सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु असुन कडक उपवास सुरु आहेत.कुरबान बागवान व त्यांचे कुटुंब हे रमजानचे काटेकोरपणे पालन करतात.
येत्या 25 मे रोजी रमजान ईद आहे.देशात मोठ्या प्रमाणात ईद साजरी केली जाते.मात्र देशावर ओढवणा-या कोरोना संकटामुळे बागवान कुठुंबाने रमजान ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही ईद रद्द करून त्यांनी शिवाजी चौक,मुस्लिम गल्ली,बौध्दनगर,संत रोहिदास नगर आदी भागातील 500 कुटुंबांना भाजीपाला वाटप केला.याकामी त्यांचे बंधु मुसा बागवान,मुले सलमान,शाहरूख,अरमान यांच्यासह मित्र परिवाराची मोठी मदत झाली.
गोरगरिबांना भाजीपाला वाटुन मी आज खरी ईद साजरी केली आहे.यापुढे कोणतीही मदत लागली तर माझ्याशी संपर्क करावा मी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द आहे असे कुरबान बागवान यांनी सांगितले.
إرسال تعليق