स्वच्छ पालेभाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी-कृषीदुतांचा शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला
 
बारामती दर्पण प्रतिनिधी :
सुपे : बारामती तालुक्यातील शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुतवळवाडीतील शाळेत परसबाग तयार करून दाखवण्यात आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत बारामती कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा परसबाग प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवण्यात आला. सध्या आहारात वाढत चाललेले केमिकलयुक्त फळे व भाज्या यांचे सेवन व त्यामुळे होणारे आजार इ. गोष्टी लक्षात घेऊन कृषीदुतानी हे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना परसबागेचे महत्त्व, फायदे, त्यासाठी लागणारा भाजीपाला, इ.घटक यांची माहिती देण्यात आली. तसेच या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, शेतकरी, युवक तसेच कृषीदूत आदित्य शेडगे,आदित्य साबळे, धीरज सुळ,सार्थक क्षीरसागर, अपूर्व मुरूमकर, ओंकार यादव, अजित शेळके इत्यादी लोक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم