बारामती दर्पण प्रतिनिधी 
 कोऱ्हाळे बुद्रुक :
 बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावामध्ये पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ॲनिमिया मुक्त गाव अभियान, ग्रामपंचायत परिसरात वृक्ष लागवड, जन सुविधा मधून मंजूर विकास कामांचे भूमिपूजन, घरकुल प्रवेश, परसबाग पाहणी, तसेच मानसशास्त्रतज्ञ रेजशा खान यांचे किशोरवयीन मुलींसाठी व महिलांसाठी मानसशास्त्रीय चाचण्या व सुविधा करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
      या अभियानाला बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने, सहाय्यक गट विकास अधिकारी एन. टी. जरांडे विस्तार अधिकारी जगताप साहेब उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी किशोर माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत गावामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेऊन सुरू असलेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच रेखा बनकर, उपसरपंच शुभांगीअडागळे, ग्रामपंचायत सदस्य राणी पानसरे, सीमा थोपटे, कल्याण गावडे, शिवाजी कोरडे, ग्रामविकास अधिकारी वर्षा तावरे, पोलीस पाटील नितीन थोपटे, निवृत्त कॅप्टन जयवंत अण्णा थोपटे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रमुख पानसरे यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी वर्षा तावरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post