बारामती दर्पण प्रतिनिधी
सोमेश्वर नगर :
बारामती तालुक्यातील होळ गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी सुरज कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उज्वला होळकर यांचा ठरलेला काळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. नवीन सरपंच निवडी करता गुरुवार दिनांक 25 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी (नाना) होळकर यांच्या सूचनेवरून सरपंच पदासाठी सुरज कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री पारवे साहेब यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामसेवक रमेश लडकत गावच्या तलाठी स्नेहा जगताप मावळत्या सरपंच उज्वला होळकर यांच्यासह सर्व सदस्य व नागरिक उपस्थित होते. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावची रखडलेली कामे मार्गी लावणार असून ज्येष्ठांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे मत यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुरज कांबळे यांनी व्यक्त केले.
Post a Comment