बारामती दर्पण प्रतिनिधी :
कोऱ्हाळे बुद्रुक :
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील शुभानंद हॉस्पिटल यांच्या वतीने बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी 0 ते 16 वयोगटातील बालकांसाठी सुवर्ण प्राशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या महामारी आणि बदलत्या हवामानात आपल्या मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे बनलेले आहे. यासाठी शुभानंद हॉस्पिटल यांच्यावतीने आयुर्वेदिक शोडस संस्कारांपैकी एक " सुवर्ण प्राशन संस्कार " शिबिर दर महिन्यातील पुष्य नक्षत्रच्या शुभ दिवशी आयोजित केले जाणार आहे. या महिन्यातील हे शिबिर बुधवार दिनांक 15 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू असणार आहे. सुवर्ण प्राशनामुळे बालकांच्या ऐकण्याची,बोलण्याची क्षमता वाढते, त्वचेची कांती सुधारते, उंची व वजन वाढण्यास मदत होते, दात येताना होणारा त्रास कमी होतो, शब्द स्पष्ट उच्चारले जातात, बुद्धी, स्मरणशक्ती व आकलन शक्ती वाढते, शब्द ग्रहण क्षमता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारापासून बचाव होतो, पचनशक्ती सुधारते तसेच भूक सुद्धा वाढते. या शिबिराची फी 100 रुपये असून नाव नोंदणी आवश्यक असणार आहे. नाव नोंदणीसाठी डॉ. संदीप निंबाळकर, मो:9604567082, डॉ.मनीषा गायकवाड निंबाळकर, मो:7030505160. यांच्याशी संपर्क करावा.
तसेच परिसरातील सर्व पालकांनी आपल्या बालकांना या शिबिरात सहभागी करून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शुभानंद हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे.
إرسال تعليق