बारामती दर्पण प्रतिनिधी
बारामती:
बारामती तालुक्यातील का-हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नवरात्र उत्सव निमित्त महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भोंडला हा हस्त नक्षत्रात येत असतो हत्तीची पूजा केली जाते हत्तीची प्रतिमा काढून त्याची पूजा करून त्याभोवती छोट्या चिमुकल्यांनी व माता पालकांनी फेर धरला व खिरापत ओळखून खाण्याचा आस्वाद लुटला यावेळी" जागर नवदुर्गाचा " हा सन्मानाने माता पालक यांना सन्मानित करण्यात आले.
महिलांसाठी आयोजित केलेल्या महाभोंडल्याच्या कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या धावपळीच्या जीवनातून जरासा विरंगळून करून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. महिलांनी आनंदाने व उत्साहाने दांडिया गरबा या खेळांचा मनसोक्त आनंद घेतला. शेवटी दसऱ्याचे मुलांना महत्त्व सांगत रावणा बरोबर वाईट गोष्टी उदा. खोटे बोलणे, चोरी करणे, आईवडीलांचे न ऐकणे, अश्या विविध गोष्टींचा संहार करण्यात आला मूल शाळेचे अनुकरण करतील म्हणून रावणाचे दहन आपण अग्नी ऐवजी मूर्ती खाली पाडून करण्यात आले. व एकंदरीत कार्यक्रम उत्साहात पार पडला अशी महिती गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्राचार्य सौ. सुप्रिया अहिरकर यांनी दिली.
إرسال تعليق