बारामती दर्पण प्रतिनिधी 
कोऱ्हाळे बुद्रुक :
जय भवानी... जय शिवाजी,  एक मराठा... लाख मराठा,  कोण म्हणतंय देत नाही.... घेतल्याशिवाय राहत नाही. अशा घोषणा देत जालना या ठिकाणी झालेल्या घटनेचा निषेध करत. सकल मराठा समाजाच्या वतीने, मौजे कोर्‍हाळे बुद्रुक येथील कटिंन पुल या ठिकाणी... रस्ता रोको आंदोलन  करण्यात आले.अंतरवाली सराटी येथील शांततामय मार्गाने करण्यात येत असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष  लाठी हल्ला व गोळीबाराचा जाहीर निषेध करण्यात आला.‌ मा. मनोज जरांगे पाटील करत असलेल्या उपोषण आणि आंदोलनाला पाठिंबा  जाहीर करण्यात आला.
मराठा समाजाला ओबीसीचा टक्का वाढवून कुणबी मराठा,  मराठा कुणबी, मराठा असे जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली..
महाराष्ट्रभरातील मराठा  आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत.
ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अमाणूस लाठी हल्ला व हवेत गोळीबार केला. अशा सर्व अधिकाऱ्यांची बडतर्फ करावे.तसेच राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा.
तालुक्याचे आमदार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा सत्तेवर लाथ मारून राजीनामा द्यावा.
अशा मागण्याचे निवेदन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन काळे साहेब तसेच तहसीलदार बारामती यांना देण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव रस्ता रोकोला रस्त्यावर बसले होते .
या प्रसंगी डॉ.दत्ता भरणे, प्रमोद पानसरे,प्रताप काका धापटे, पृथ्वीराज नलवडे, प्रदीप बापू धापटे यांनी निषेध व्यक्त केला. याप्रसंगी लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, बजरंगवाडी, मिळशिकारेवाडी, थोपटेवाडी, कोर्‍हाळे बुद्रुक या ठिकाणचे समाज बांधव उपस्थित होते. यावेळी  वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

أحدث أقدم