बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:
कोऱ्हाळे बुद्रुक येथील प्रसिद्ध व्यापारी रतनलाल दोषी यांचे चिरंजीव आशिष रतनलाल दोशी (वय:३८)यांचे आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आशिषचा तरुण वयात अचानक हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने दोशी कुटुंबावर व कोऱ्हाळे बुद्रुक पंचकोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आशिष हा शांत स्वभावाचा व अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्याच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी,एक भाऊ, भावजय, एक मुलगा व एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्याचा अंत्यविधी आज शुक्रवार दि:३ रोजी सकाळी दहा वाजता कुऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी होणार आहे.
    मागील दोन दिवसापूर्वी सोमेश्वर नगर येथील केंजळे यांच्या मुलाच वयाच्या 32 व्या वर्षी असच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले तर परवा पुण्यातही एका २२ वर्षीय मुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाला, दोन्हीही घटना ताज्या असतानाच कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण आशिषच हृदयविकाराने निधन झाले आहे. वयाच्या तीशीतच हृदयविकार आता तरुणांना गाठत असल्याने या विषयी आता चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

أحدث أقدم