बारामती दर्पण प्रतिनिधी
मांजरी:
मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक व मानद सचिव कै.बाबुरावजी घोलप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी दिली. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. केतन डुंबरे यांनी कै.बाबुरावजी घोलप यांच्या कार्याचा सर्वांना परिचय करून दिला. प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
إرسال تعليق