बारामती दर्पण प्रतिनिधी
माळेगाव:
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (1) व (3) जारी केले असताना तसेच मिरवणूक काढण्यास तसेच वाद्य वाजविण्यास मनाई असताना  सुद्धा बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे विनापरवानगी डीजे वाजवल्या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी मॉडीफाय केलेल्या डी.जे. वर कारवाई करत डी.जे. जप्त केला आहे.
    जिल्हाधिकाऱ्यांच्या या  आदेशाला न जुमानता धार्मिक कार्यक्रमाला पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमवून डीजे वाजवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमजद आदम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष विठ्ठल शिंदे (वय:४३) रा. शिवनगर माळेगाव बु! ता.बारामती, श्री. चव्हाण(पूर्ण नाव व पत्ता माहित नाही.) यांच्यावर भा. द. वि. 188, म. पो.का. कलम 135 सह ध्वनी प्रदूषण व नियंत्रण 2000चे कलम 5, 5A, 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم