बारामती दर्पण प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर:
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे चोपडन, ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक २८/११/२०२२ राजी रात्री ०२.०० वा. दरोडा टाकून चोरट्यांनी सुमारे अकरा लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी केली होती. फिर्यादीचे राहत्या घरात अनोळखी चोरटयांनी येऊन फिर्यादीची घराचे पाठीमागील सेफ्टी दरवाजाचे आतील कडी काढून घरात प्रवेश करून बेडरुममध्ये येवून एक उंच असलेल्या आरोपीने फिर्यादीचे तोड हाताने दाबुन चाकुचा धाक दाखवून तुम चुप रहो आपके पास जो है वह दे दो असे हिंदीत बोलून दुसरे आरोपीने फिर्यादीचे गळ्यातील तीन तोळा वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने कटरने कापून घेवून व दोन्ही हातातील ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढून बेडरुममध्ये असलेले लोखंडी कपाटातील हिरे, सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम ८५ हजार रुपये असा एकूण १०,७७,५००/- किमतीचा माल जबरदस्तीने चोरी करून चोरून नेला होता. त्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुरजि.नं. ४१५/२०२२ भादंवि कलम ३९२.२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. अंकित गोयल सो, मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग श्री. आनंद भोईटे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण श्री. अविनाश शिळीमकर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पो.स.ई अमित सिद-पाटील, सहा फौज रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, पो.हवा. स्वप्निल अहिवळे, अभिनीत एकशिंगे, सचिन घाडगे, राजू मोमीन, विजय कांचन, आसिफ शेख, सहा फौज काशीनाथ राजापुरे, वडगाव निबाळकर पो.स्टे. कडील पो.हवा. सूर्यकांत कुलकर्णी, पो.ना. हिरामण खोमणे, भाउसाहेब मारकड, पो. कॉ. पोपट नाळे, अमोल भुजबळ, नामदेव साळुंके यांची संयुक्त पथके तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांना पुढे होते त्याकरीता पोलीस पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढली असता सदरचा गुन्हा हा संदिपान झुनझुन्या भोसले याचे टोळीतील सदस्याने केला असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी नामे १) संदीपान नया भोसले, रा. पिंपळी, ता. बारामती, जि.पुणे. २) शरद झुंनन्या भोसले, मूळ रा. पिंपळी, ता. बारामती, जि.पुणे. सध्या रा. कासुर्डी, ता. पांड जि.पुणे. ३) अमोल नहाना काळे, रा. पोबलवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर, ४) रितेश अर्जुन काळे, रा कासुर्डी, ता. दौड, जि. पुणे. ५) पांडा उर्फ पांडुरंग गोरख उर्फ गोरया मोरसले वय २५ वर्षे, मूळ रा टाकली, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. कासुर्डी, ता. दीड, जि. पुणे यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यांचे ३. साविदारांचा शोध चालु आहे. सदरचा गुन्हा हा पाच पेक्षा जास्त आरोपांनी केलेला असल्याने गुन्हयास दरोडयाचे वाढीव कालम लावण्यात आले आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपीकडून गुन्हयात गेले मालापैकी सोन्याचे कानातील टॉप्स व चांदीच्या पट्टया जप्त करण्यात आलेल्या असून गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे तो सुध्दा आरोपींनी चोरून आणलेली असून त्याबाबत तपास चालू आहे. गुन्हयातील आरोपीना दिनांक ०५/०९/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली असून गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ लांडे हे करीत आहेत.
إرسال تعليق