बारामती दर्पण प्रतिनिधी
पुणे :
  पुण्यातील नवले ब्रिजवर ( Navale Bridge Accident ) अपघात सत्र सुरूच आहे. आज नवले ब्रिज जवळ भीषण अपघात झाला असून भरधाव टॅंकरने अनेक गाड्या उडवल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात जवळपास 47 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये काही गाड्यांचा चक्काचूर झाला असून अनेक गाड्या रस्त्यावरच पलटी झाल्या आहेत.
 दरम्यान, सदर ठिकाणी अग्निशमन विभागाच्या 02 रेस्क्यू वाहन काम करत आहेत. अपघातात (Navale Bridge Accident)अनेकजण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात असून घटनास्थळी सिंहगड पोलीस दाखल झाले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم