बारामती दर्पण प्रतिनिधी
मांजरी बु:
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी बु व आयआयटी खरगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांमधील उद्योजकवृत्ती ओळखून त्याच्या वाढीस खतपाणी घालण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेत प्रकाश शर्मा, प्राजक्ता मंदार जोशी, इस्माईल अकबानी या उद्योजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अभियांत्रिकी शिक्षणासोबतच स्वतःमधील सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता कशी जोपासावी तसेच कशी वाढवावी याबद्दल आंतरराष्ट्रीय उद्योजकता पर्यावरण प्रणालीचे राजदूत प्रकाश शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना करिअरसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींविषयी पुणे महिला सोलो प्रवाशी ग्रुपच्या संस्थापक प्राजक्ता मंदार जोशी यांनी मार्गदर्शन केले. उद्योजक व स्टार्टअप मार्गदर्शक इस्माईल अकबानी यांनी विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता करिअरच्या दृष्टीने कशी विकसित करावी तसेच दैनंदिन जीवनात मानवी मुल्यांची जोपासना कशी करावी याबद्दल आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.अनुराधा जाधव व आयआयटी खरगपूर मधील उद्योजकता विभागाकडून आकांक्षा राज यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले होते. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
إرسال تعليق