बारामती दर्पण प्रतिनिधी
वीर:
सध्या वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 2000 Cusecs व डावा कालवा विद्युतगृहातुन 1000 Cusecs विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून आज रात्री 9 वाजता 7637 Cusecs विसर्गामध्ये वाढ करून 13911 Cuesecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नीरा नदीपात्रात एकूण 16911 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो असही धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा असे आवाहन ही धरण प्रशासनाने केले आहे .
إرسال تعليق