बारामती दर्पण प्रतिनिधी
नाशिक:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खंजीर चिन्ह मागण्यापेक्षा आ गोपीचंद पडळकर यांनाच निवडणूक आयोगाने मंगळसूत्र निशाणी द्यावी असा टोला राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी लगावला आहे.
काल मिडीयाला बाईट देतांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीप्रमाणे बरळले की निवडणूक आयोगाला विनंती करेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खंजीर निशाणी द्यायला सांगेल. मला वाटते पवार कुटुंबांशिवाय पडळकरांना दुसरी व्यक्तीच दिसत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत आ अजित दादांकडून त्यांचे डिपाॅजिट जप्त झाल्याने त्यांची बुध्दी भष्ट्र झालेली दिसते. त्यामुळे मिडीयासमोर आले की त्यांना पवार साहेबच दिसतात. आता मुख्यमंत्री पदावरून खंजीर कोणी खुपसला हे त्यांना उमजत नसेल कारण सकाळी सकाळी भांग घेऊन मिडीयासमोर बोलतात वाटतं. त्यामुळे अशा लोकांना मिडीयाने प्रसिध्दी देऊ नये.
एक मात्र राष्ट्रवादीची कार्यकर्ती म्हणून नक्की सांगते जोपर्यंत अजित दादा बारामतीतून विधानसभा लढवतील तोपर्यंत गोपीचंद पडळकर आपला पराभव शंभर टक्के निश्चित आहे. त्यापेक्षा आपणंच मंगळसूत्र चोर आणि पाकीटमार म्हणून प्रसिद्ध मिळवलीच आहे तशी पोलिस स्टेशन ला नोंदही आहे. तेव्हा आगामी निवडणुकीत आपण भाजपकडून उमेदवारी करण्यापेक्षा निवडणूक आयोगाकडून मंगळसूत्र निशाणी मागा किमान त्यातून तरी दोन चार समविचारांची लोक आपल्याला मतदान करतील. नाहीतर आपला विजय होईल हे दिवास्वप्नच ठरेल यात शंका नाही.
إرسال تعليق