बारामती दर्पण प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर:
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  अभिनव देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व  मिलिंद मोहिते सो. अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण तसेच गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ , पत्रकार बांधव, सर्व ग्रामपंचायत सर्व सामाजिक सेवाभावी संस्था, पोलीस पाटील तसेच नागरिकांच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांनी शनिवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी हे रक्तदान आयोजित केले आहे. 
    वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, करंजेपूल दुरक्षेत्र, माऊली मंगल कार्यालय सुपा, सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव व शिरष्णे येथे सकाळी ९ ते ५ पर्यंत हे शिबिर पार पडणार आहे.
या भव्य रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे API सोमनाथ लांडे यांनी केले आहे.
गेल्यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्ह्यातील सर्वाधिक एकूण १३१७ रक्तदात्यांनी रक्तदान करत एक उच्चांक केला होता. यामध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मधील ३ पोलीस अधिकारी व २५ पोलीस अंमलदार यांनी सुद्धा रक्तदान करून सक्रिय सहभाग सहभाग नोंदवला होता. मागील वर्षी कोरोना लस घेतल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही रक्तदान करता आले नाही यावेळी मात्र हा सहभाग मागील वर्षीपेक्षा जास्त वाढणार असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक बॉटल रक्त संकलित होईल अशी माहिती मोरगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم