बारामती दर्पण प्रतिनिधी
सोमेश्वरनगर:
 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी पूर्ण भारत भर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. या वर्षी रविवार येत असला तरी जयंती रविवारीच साजरी करावी असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र काही शाळांमध्ये जयंती कधी साजरी करावी याबाबत संभ्रम आहे.
   राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्ती जयंती दिन व राष्ट्रीय दिन साजरी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ सप्टेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढले आहे. यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की राष्ट्रपुरुष /थोर पुरुष व राष्ट्रीय दिन हे शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी येत असले तरी त्या त्या दिवशीच ते साजरे करावेत. 
    थोर पुरुषांची माहिती,त्यांनी देशासाठी व समाजासाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांना कळावे यासाठी शाळा महाविद्यालयाने त्यांच्या जयंतीनिमित्त विविध व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करावे. मात्र सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जयंती आल्यास अशा प्रकारचे उपक्रम जयंतीच्या आदल्या दिवशी घ्यावेत. 
    शासनाच्या परिपत्रकात जयंतीनिमित्त होणारे उत्सव आदल्या दिवशी घ्यावे असे स्पष्ट लिहिले असताना काही शाळांनी मात्र जयंतीच आदल्या दिवशी साजरी करावी असा चुकीचा अर्थ घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे महात्मा गांधी जयंती आदल्या दिवशी साजरी न करता रविवारी 2 ऑक्टोबर रोजी साजरी करणे बंधनकारक आहे

Post a Comment

أحدث أقدم