बारामती दर्पण प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर:
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे काल शनिवार दिनांक २४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ, सर्व ग्रामपंचायत, सर्व पत्रकार बंधू, सर्व पोलीस पाटील, सर्व होमगार्ड, महिला दक्षता समिती, सर्व सेवाभावी संस्था, तसेच सर्व नागरिकांच्या मदतीने व अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने झालेल्या या रक्तदान शिबिरात ८०१ रक्त बॉटल संकलित करण्यात आले. सर्वांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, करंजेपूल दूरक्षेत्र श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव, माऊली लॉन्स मंगल कार्यालय सुपा, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसने येथे एकूण 801 रक्तदान बॅग रक्त संकलन झाले. (वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन 165, करंजेपूल दूरक्षेत्र 251, श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव 104, माऊली लॉन्स मंगल कार्यालय सुपा 179, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसने 101) येथे रक्त संकलन झाले आहे, या सर्वांचे वडगाव निंबाळकर पोलिसांनी आभार व्यक्त केले आहे. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना वर्षभरात कधीही रक्त लागले तर त्यांना अक्षय ब्लड बँकेमार्फत मोफत रक्त दिले जाणार असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. यावेळी रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी लांडे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
إرسال تعليق