बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक (सोमनाथ लोणकर)
भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72 वा वाढदिवस संपूर्ण देशात उत्साहात साजरा झाला .बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रुक येथे ही पंतप्रधान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .कोऱ्हाळे बु येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने को-हाळे बुद्रुक येथील स्मशानभूमी येथे 72 झाडांचे वृक्षारोपण करून मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी कोऱ्हाळे बुद्रुक चे सरपंच रवींद्र खोमणे तसेच बारामती तालुका भाजपा विद्यार्थी आघाडी चे अध्यक्ष प्रशांत लव्हे तसेच भाजपा बारामती तालुका उपाध्यक्ष बापूराव फणसे तसेच जिल्हा उपाध्यक्ष विनोद खोमणे त्याचबरोबर युवा कार्यकर्ते अभिजित खोमणे,तुषार भगत, बबन चव्हाण, शेखर खोमणे सिकंदर चव्हाण, दीपक शिरतोडे आदी उपस्थित होते यावेळी वृक्षरोपण करून मा.नरेंद्रजी मोदी यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातून भारत देशाची अशीच अविरत सेवा घडो अशा शुभेच्छा देण्यात आल्या .
إرسال تعليق