बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथे धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर तसेच मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 56 बॉटल रक्त संकलन करण्यात आले.यामध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती.तसेच ७० जेष्ठ नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली व अत्यंत माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी १२ ज्येष्ठांना मोतीबिंदू ऑपरेशनची गरज असल्याने येणाऱ्या रविवारी दिनांक ११ रोजी पुणे येथील बुद्रानी हॉस्पिटल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रक्तदानासाठी पुणे येथील अक्षय ब्लड बँक तसेच मोफत डोळे तपासणीसाठी उज्वल सेवाभावी प्रतिष्ठान जळगावसुपे व बुद्राणी हॉस्पिटल पुणे, यांनी मोलाचे परिश्रम घेतले. शिबिराचे उद्घाटन  थोपटेवाडी गावच्या सरपंच रेखाताई बनकर, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल दादा खलाटे, माजी सभापती प्रदीप बापू धापटे,गावचे पोलीस पाटील नितीन थोपटे, माजी सरपंच सुनील खलाटे, ज्येष्ठ नागरिक वसंतराव जाधव, तुकाराम पानसरे, किसन भगत, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिराला दुपारी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप पाटील जगताप यांनी भेट दिली. तसेच मंडळाने आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी धर्मवीर संभाजीराजे गणेश उत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी चोख व्यवस्था केली होती.

Post a Comment

أحدث أقدم