बारामती दर्पण प्रतिनिधी:
कोऱ्हाळे बुद्रुक:
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावच्या भैरवनाथ देवाची यात्रा शनिवार दिनांक २३ एप्रिल पासून सुरु होत आहे. यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती गावच्या भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे.
     शनिवार दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता देवाच्या हळदी होणार असून याच दिवशी संध्याकाळी ६ वाजून ५८  मिनिटांनी देवाचे लग्न कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी रात्री ८ वाजता देवाचा छबिना निघणार आहे. रविवार दिनांक २४ रोजी रात्री ९ वाजता प्रकाश अहिरेकर सह निलेशकुमार अहिरेकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
दिनांक २५ रोजी संध्याकाळी ९ वाजता खास महिलांसाठी मराठी व हिंदी लोकगीतांचा ऑर्केस्ट्रा "जल्लोष" हा ठेवण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांचा गावातील नागरिकांनी आस्वाद घेऊन यात्रा कमिटीस सहकार्य करावे असे आवाहन थोपटेवाडी गावच्या भैरवनाथ यात्रा कमिटीने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post