बारामती दर्पण प्रतिनिधी
मोरगाव :
बारामती तालुक्यातील श्रीक्षेत्र ग्रामपंचायत मोरगांव येथील सरपंच निलेश हरीभाऊ केदारी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केले आहे .सदर पुरस्कार जिल्हा परीषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला .
जिल्ह्यातील आदर्श जिल्हा परीषद सदस्य , सरपंच , ग्रामसेवक ,शाखा अभीयंता , गुणवंत शिक्षक , विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आज दि. २० रोजी संपन्न झाला. गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परीषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे , उपाध्यक्ष रणजित शिवतारे , जिल्हा परीषद सदस्य भरत खैरे ,मोरगांवचे माजी सरपंच पोपट तावरे , उपसरपंच संतोष नेवसे , ग्रामसेवक मोरेश्वर गाडे आदी उपस्थित होते .
मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी ग्रामपंचायत मोरगावच्या माध्यमातून रस्ते , लाईट , पाणी , स्वच्छता आदी सोई सुविधा निर्माण करून दिल्या आहेत . गावातील नागरीकांना मूलभूत सुविधांबरोबर कोरोना काळात विविध उपाय योजना राबबुन कोरोना वेशीवरच अडवून ठेवला होता . केदारी यांनी राबविलेल्या योजना व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पुणे जिल्हा परीषदाचा आदर्श सरपंच पुरस्काराने त्यांना सन्मानित केले .या पुरस्कारानंतर बोलताना केदारी यांनी सांगितले की , हा पुरस्कार समस्त मोरगावकर ग्रामस्थांचा असून आगामी काळात मोरगांवकरांना अधीकाधीक सुवीधा पुरविण्याचा मानस असेल .
Post a Comment