बारामती दर्पण प्रतिनिधी:
बारामती:
बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथे बुधवारी (दि. १६) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १५ तोळे सोने व ५ हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला.
ढेकळवाडी येथील बाळकृष्ण साहेबराव टकले यांच्या ३५ फाटा येथील घराच्या स्लॅबवर चोरट्यांनी मध्यरात्रीच्या वेळेस प्रवेश केला. या स्लॅबवरून घरामध्ये येणाऱ्या जिन्याचा दरवाजा कटावणीच्या साह्याने कापून चोरट्यांनी घरांमध्ये प्रवेश केला.
कपाटातील ५ हजार रुपये रोख व किचनमधील डब्यांमध्ये ठेवलेले सोन्याचे सुमारे १५तोळ्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी डब्यामध्ये दागिने शोधत असताना किचनमधील चार पाच डबे उघडेच ठेवलेले होते, तसेच कपाटातील पैशाचे पाकीट पैसे काढून घेतल्यानंतर घराच्या छतावर फेकून दिले. हे पाहिल्यानंतर घरामध्ये चोरी झाली असल्याचे टकले कुटुंबीयांना सकाळी झोपेतून उठल्यावर समजले. याबाबत टकले यांनी बारामती ग्रामीण पोलिस स्टेशनला खबर दिली. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी घटनास्थळाची जाऊन पाहणी केली.

Post a Comment

Previous Post Next Post