बारामती दर्पण प्रतिनिधी:
मोरगांव:
मोरगाव नजीक कार आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात बारामतीतील तिघांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा झालेल्या या अपघातात दोन महिला आणि एका युवकाचा समावेश आहे. सराफ व्यवसायिक श्रेनिक भंडारी यांच्या पत्नी अश्विनी भंडारी,मुलगा मिलिंद भंडारी व बहीण कविता शहा यांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने बारामती हळहळ व्यक्त होत असून भंडारी आणि शहा या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


या अपघातामध्ये जखमी बिंदिया भंडारी याना पुढील उपचारासाठी रुबी हॉस्पिटल मधे ॲडमीट केले आहे ... परिवाराकडुन मिळालेल्या माहीतीत सोन्याचा माल असलेली बॅग देखील गायब झाल्याचे समजले आहे ...
हे कुटुंब एका घरगुती कार्यक्रमास्तव पुण्याला गेले होते सदर चा कार्यक्रम मंगळवारी दुपारी झाल्यानंतर सराफ व्यवसायानिमित्त दुकानच्या कामासाठी बाहेर पडले ... बारामतीकडे परतताना अपघात झाला ..
मिलिंद भंडारी हा अपघातानंतर फोन चे लॉक उघडुन देवुन त्रयस्थ ईसमाने घरच्या लोकांशी संपर्क करुन दोघी  ऑन दी स्पॉट गेल्याचे सांगीतले तर तो स्वत: घरच्याशी मी आहे असे बोलत होता दीड तासानंतर तो ही उपचाराला प्रतिसाद देत नव्हता स्टेअरींग पोटावर जोरात आदळल्याने तो जखमी होता .

Post a Comment

Previous Post Next Post