बारामती दर्पण प्रतिनिधी:
पुणे:
पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे एक हाती वर्चस्व आहे. बँकेच्या निवडणूकीनंतर अध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार या चर्चेला उधाण आले होते. आज  अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. त्यांच्या निवडीने जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post