बारामती दर्पण (प्रतिनिधी)
वडगाव निंबाळकर :
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील युनियन बँकेच्या शाखेला टाळे ठोकणाऱ्या राजेंद्र रामचंद्र थोपटे याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोपटे याने बुधवार दिनांक 29 रोजी बँकेत येऊन माझ्या ए.टी.एम लोकेशनचे काय झाले असे म्हणत बँकेच्या लोखंडी शटरला आपल्याकडे असलेले कुलूप लावून शटर बंद केले. राजेंद्र थोपटे यांनी कुलूप लावून शटर बंद केले असल्यामुळे बँकेच्या बाहेर उभ्या असलेल्या ग्राहकांची गैरसोय करून बँकेचे व्यवहार थांबवून बँकेच्या कामात अडथळा निर्माण केल्यामुळे बँकेचे मॅनेजर तेजस शाम महानुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी राजेंद्र थोपटे याच्यावर भा.द.वि कलम 342, 186 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र फणसे हे करीत आहेत.
हेच का माजी सैनिक संघटनेचे कार्य...
थोपटे हे माजी सैनिक संघटनेचे सदस्य आहेत.बारामती तालुक्यतील पश्चिम भागात स्थापन झालेल्या माजी सैनिक संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे. काही दिवसांपूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान एका पत्रकाराचे नाव घेऊन तो अजितदादांविरोधात बातमी देतोय त्याच्यावर कारवाई करा असे म्हणत या महाशयांनी अकलेचे तारे तोडले होते. त्यावर संबंधित पत्रकाराने माजी सैनिक संघटनेकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यामुळे आता माजी सैनिक संघटनेचे हेच कार्य आहे का अशी चर्चा जनमानसात होऊ लागली आहे.
Post a Comment