बारामती दर्पण प्रतिनिधी
मोरगाव :
मोरगाव ता . बारामती येथील तीन महाविद्यालयीन युवतींचा अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला . यामध्ये ऋतुजा दिपक तावरे वय वर्षे १९ हिचा जागीच मृत्यू तर दुचाकीवरील रुपाली अरुण कौले व अंकीता विष्णु तावरे या गंभीर जखमी झाल्या असुन या तीघीही सुपा येथील विद्या प्रतीष्ठानमध्ये शिकत आहेत .
बारामती तालुक्यातील विद्या प्रतीष्ठानच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्गात ऋतुजा दीपक तावरे , अंकीता विष्णू तावरे , व रुपाली अरुण कौले या शिकत आहेत . आज दि २९ रोजी महाविद्यालय सुट्टीनंतर आपल्या दुचाकीवरुन सुप्यावरुन मोरगावला येथे येत होत्या . दरम्यान सुपा -मोरगाव या रस्त्यावरील राजबाग पाटी नजीक दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान आल्या असता अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली .
यामध्ये मोरगाव नजीक शेराचीवस्ती येथील ऋतूजा दिपक तावरे या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला .तर अंकीता विष्णु तावरे , रुपाली अरुण कौले या गंभीर जखमी झाल्या आहेत . त्यांना मोरगाव येथे खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे
Post a Comment