बारामती दर्पण
वडगाव निंबाळकर (प्रतिनिधी):
बारामती तालुक्यातील मुढाळे गावातील जिल्हा परिषद शाळेतील चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
 काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सदर पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मौजे मुढाळे तालुका बारामती जिल्हा पुणे गावच्या हद्दीत जिल्हा परिषद शाळेची घरफोडी ही इसम नामे राजेंद्र जाधव व त्याचे इतर साथीदार यांनी मिळून केली आहे. सदरची माहिती मिळताच राजेंद्र जाधव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदरच्या घरफोडी बाबत विचारपूस केली असता त्याने सदरची घरफोडी ही त्याचे साथीदारांसोबत केले असल्याचे सांगितले.राजेंद्र मारुती जाधव (वय 28 वर्ष रा. मुढाळे तालुका बारामती जिल्हा पुणे) लक्ष्मण मल्हारी सकाटे (वय 31 वर्ष राहणार मुढाळे तालुका बारामती जिल्हा पुणे ) राहुल वसंत सकाटे (वय 20 वर्ष राहणार मुढाळे तालुका बारामती जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरची घरफोडी केल्याचे सांगितल्याने सदर इसमांना वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 344/2021 भा द वि क 454 457 380* या गुन्ह्याचे  पुढील तपास कमी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. 
    वरील आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले कॉम्पुटर स्क्रिन्स, व शाळेतील मुलांचे पोषण आहाराची भांडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा.पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख ,
मा.अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,सहा पोलिस निरीक्षक संदिप येळे,पो हवा रविराज कोकरे,पो हवा आसिफ शेख,पो ना अभिजित एकशिंगे ,पो ना स्वप्निल अहिवळे ,पो हवा राजापुरे यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم