मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथे दिपावली पाडव्याच्या निमित्ताने राज्यभरातील भावीकांनी मयुरेश्वर दर्शनासाठी गर्दी केली होती . आज पाडव्याच्या निमित्ताने राज्य महीला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली उपस्थित भावीकांना त्यांनी दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या .
आज दिपावली पाडव्याच्या निमित्ताने पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर मंदीराचा मुख्य दरवाजा भक्तांना दर्शनासाठी खुला करण्यात आला . आज सकाळी सात वाजता सालकरी ढेरे तर दुपारी चिंचवड देवस्थानच्यावतीने मयुरेश्वराची पुजा करण्यात आली . आज दिवसभरात पुणे , सातारा , सांगली , सोलापुर , ठाणे , अहमदनगर , बीड आदी भागातून भक्त दर्शनासाठी आले होते . पाडव्याचे औचित्य साधून हजारो भक्तांनी आज श्रींचे दर्शन घेतले . दिपावली सुट्ट्यांमुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पेठेतील दुकाने हार , दुर्वा फुले , श्रींच्या प्रतीमांनी सजवली होती .
मोरगावचे वाहन तळ , हॉटेल , फुल - पेढे दुकाने आदी भावीकांनी फुल्ल भरली होती . गेल्यावर्षी दिपावली काळात राज्यातील सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळांबरोबर मोरगाव मंदिर बंद होते .यामुळे स्थानिक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले होते . दरम्यान आज दुपारी राज्य महीला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले व आरती केली . यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने विश्वस्त विनोद पवार यांनी त्यांचे शाल व श्रींची प्रतीमा देऊन सत्कार केला . तर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच निलेश केदारी यांनी सत्कार केला . यावेळी माजी सरपंच पोपट तावरे , बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष अक्षय तावरे , गणेश कुंभार आदी उपस्थित होते .
إرسال تعليق