मोरगाव(प्रतिनिधी)
 :  मोरगांव ता . बारामती येथील मोरया सायकल कल्बच्या बारा युवकांनी सायकलवरुन अष्टविनायक यात्रा पुर्ण करण्याचा अनोखा उपक्रम पुर्ण केला . तब्बल सहाशे किमी अंतर अवघ्या सदोतीस तासात पुर्ण  केले असुन  या सायकल स्वारांनी गावोगावी सायकलींग चे महत्व पटवुन  दिले.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथील युवक दररोज सायकल सवारी करुन  व्यायाम व पर्यावरणाच्या दृष्टीने सायकलिंग  किती महत्वाची आहे याचे महत्व पटवुन देत आहेत .   रवीवार दि . ७ रोजी पहाटे   मोरगांव येथील मयुरेश्वर दर्शन घेऊन या सायकल कल्बचे  काका कुतवळ , नाना नेवसे  , विकास गुरव , वैभव शिंदे , सागर भोंडवे , नितीन तावरे ,  सागर उबाळे , रीतेश चांदगुडे  ,  योगेश बोरकर  ,रोहीत गुरव ,  सोमनाथ साळुंके , बाबुराव भापकर  यांनी  अष्टविनायक यात्रेस सुरवात केली .
मोरगाव , सिद्धटेक , रांजणगाव , ओझर , लेण्याद्री , पाली ,  महड , थेऊर व पुन्हा मोरगांव  असा तब्बल  सहाशे सतरा किमी चा प्रवास या युवकांनी सायकलवरुन केला . गावोगावी त्यांनी सालकल व व्यायामाचे महत्व पटवून दिले  . सर्व विश्वस्त संस्था कार्यालयाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले . बुधवार  दि १०  रोजी उशीरा अष्टविनायक करुन हे  सायकलस्वार  पुन्हा मोरगाव येथे आले . या सर्वांचे स्वागत श्रीफळ व हार देऊन मोरगावचे सरपंच निलेश केदारी व  ग्रामसेवक मोरेश्वर गाडे यांनी  केले .

Post a Comment

أحدث أقدم