मोरगाव(प्रतिनिधी):
 : बारामती तालुक्यातील मोरगांव येथे अष्टविनायकाचा पहीला गणपती आहे . यामुळे येथे  जगभरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त  मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. यामध्ये पुण्यातील भक्तांची संख्या  नगण्य असून मोरगाव येथून नोकरी , व्यवसाय , शिक्षणासाठी पुणे , जेजुरी , सासवड येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधीक आहे . यामुळे पुणे  महानगर परीवहन मंडळाने उद्या दि .७ रोजी  घटस्थापनेच्या मुहर्तावर पिएमटी बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत परीपत्रक काढले आहे .

मोरगाव हे अष्टविनायकापैकी प्रथम व महत्वाचे स्थान असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे गणेश भक्त दर्शनासाठी येतात .तसेच व्यवसाय , नोकरी  निमित्ताने जेजुरी ,सासवड ,पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या व येणाऱ्या भक्तांची संख्या  गृहीत धरुन  जेजुरी प्रमाणे  मोरगाव येथून पिएमटी बस सेवेची आवश्यकता असल्याबाबत पत्रव्यव्हार मोरगांवचे सरपंच निलेश केदारी यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीकडे केला होता . 

तसेच  मोरगांव येथे येणाऱ्या भक्तांच्या अधीक सुविधेसाठी  पुणे महानगर परीवहन मंदिरडळाकडे पिएमटी सेवा सुरु करण्याची मागणी चिंचवड देवस्थान ट्रस्टने पत्रव्यव्हाराद्वारे केली होती अशी माहीती  विश्वस्त विनोद पवार दिली .  उद्या घटस्थापनेच्या मुहर्तावर प्रायोगिक तत्त्वावर दिवसभरात पाच पिएमटी बस  मोरगाव -  हडपसर धावणार असुन याबाबतचे अधीकृत वेळापत्रक पुणे महानगर परीवहन मंडळाने काढले आहे .

Post a Comment

أحدث أقدم