मोरगाव :  बारामती तालुका  तलाठी संघटनेची  सर्वसाधारण सभा काल दि .२६ रोजी  मुख्य प्रशासकीय भवन सभागृह बारामती येथे  संपन्न झाली  . यामध्ये  बारामती तालुका अध्यक्षपदी रवी कदम तर उपाध्यक्ष पदी श्याम झोडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
बारामती तालुका महसूल ख्यात्याच्या  सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा काल बारामती येथे पार पडली . यावेळी तालुक्यातील सर्व तलाठी व मंडलाधीकारी  उपस्थित होते.   सदर सभेत  तलाठी संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात  आली . यामध्ये  रवि कदम यांची अध्यक्ष तर   मोरगाव मंडल कार्यक्षेत्रात काम करणारे  श्याम झोडगे  यांची  उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली   जावेद मुलानी यांची कार्याध्यक्ष तर  गजानन पारवे - सचिव पदी निवड करण्यात आली . 
 यानिवडीनंतर  तरडोली ग्रामपंचायतीच्या वतीने सोमेश्र्वर सहकारी  साखर कारखाना संचालक किसन तांबे ,  सरपंच नवनाथ जगदाळे , उपसरपंच महेंद्र तांबे , पुणे जिल्हा परीषद जल व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष हनुमंत भापकर यांनी त्यांचा सत्कार केला . निवडीनंतर  साप्ताहिक बारामती दर्पणशी बोलताना  श्याम झोडगे 
 म्हणाले की,तलाठ्याना मिळणारा  सादिल भत्ता (स्टेशनरी अलाउंस) पूर्वी शंभर रुपये . होता तो तलाठी यांना  1000  तर  मंडल अधीकारी यांना  1500 याप्रमाणे मिळावा . जुनी पेंशन योजना लागू करणेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم